दुर्गराज राजगड तब्बल ७५ वेळा सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajgad

कोंढवे धावडेच्या शिवभूमी भ्रमंती ग्रुपने आयोजन केले. वडगाव मावळच्या दुर्ग संवर्धन संस्था, खडकीच्या सेंट्रल ए.एफ.व्हि. डेपोतील मित्र सहभागी झाले.

दुर्गराज राजगड तब्बल ७५ वेळा सर

खडकवासला - घोंगवणारा सोसाट्याचा वारा… मुसळधार पाऊस… काही अंतरावरचे न दिसणारे दाट धुके… शेवाळलेल्या आणि चिखलातील निसरड्या पायवाटा… हुडहुडी भरविणारी थंडी… अशा वातावरणात शिवरायांचा जयघोष आणि भारतमातेच्या जयजयकार करीत १५ हुन अधिक जणांनी पाच वेळा म्हणजे तब्बल ७५ वेळा दुर्गराज राजगड सर करत अनोखी मानवंदना दिली. हि मोहीम सात तासात संपली.

कोंढवे धावडेच्या शिवभूमी भ्रमंती ग्रुपने आयोजन केले. वडगाव मावळच्या दुर्ग संवर्धन संस्था, खडकीच्या सेंट्रल ए.एफ.व्हि. डेपोतील मित्र सहभागी झाले. मोहिमेत २५ जण होते. त्यापैकी चार जण दक्ष सरपाटिल, स्वराज लिंबोरे, शीव दारवटकर, शिवराज लिंबोरे आठ ते १५ वर्षातील होते. तर ५२ वर्षाचे राजाभाऊ कुलकर्णी होते.

मोहीम पहाटे पाच वाजता सुरु करायची होती. म्हणून रात्रीच पाल गावात मुक्काम होता. रात्रभर सोसाट्याचा वारा व जोराचा पाऊस सुरु होता. शिववंदना पहाटे पाच वाजता करून मोहिम सुरु झाली. संपूर्ण पायवाट घसरडी होती. सावकाश चालण्याशिवाय पर्याय नव्हता. रेनकोट, प्लास्टिक पिशवी, हातात स्टिकने तोल सांभाळत शिवघोष करीत वाटचाल सुरु होती. शेवटच्या फेरीत खडकी डेपोचे सुरक्षा अधिकारी संतोषकुमार दास यांच्या सोबत पूर्ण केली. पूर्ण मोहीम दुपारी बारा वाजता संपली.

राजगड

- पाल बुद्रुक बाजूने २ किलोमीटरची थेट चढण

- चढण्यासाठी ४० मिनिटे

- उतरण्यासाठी ३० मिनिटे

- पद्मावती माचीवर मंदिरासमोर देवीचे पूजन केले.

- त्यानंतर, २० बाय ३० चा तिरंगा फडकाविला.

मोहिमेतील न्याहरी

- भाजलेले शेंगदाणे, गुळ, चक्की, आणि धबधब्याचे पाणी

सतरा जणांनी सलग पाच वेळा

अशोक सरपाटील, विनायक दारवटकर, दिगंबर शेळके, प्रविण पोकळे, गणेश जाधव, हनुमंत जांभुळकर, चैतन्य बोडके, नितिन चव्हाण पाटील, राजेंद्र बेंद्रे, श्रीनिवास कुलकर्णी, जाकिर सय्यद, नितिन भोईटे, मुगाजी मांगडे, दिलीप ढोके, सिद्धार्थ ढोके, सतिश उंबरेकर, शिवराज लिंबोरे, या सतरा जणांनी सलग पाच वेळा राजगड सर केला. तर स्वराज लिंबोरे, शीव दारवटकर, अमित गजमल, सचिन भोईटे, अश्विन पित्रोडा, दक्ष सरपाटिल या सहा जणांनी सलग चार वेळा गडाची चढाई पूर्ण केली. महेश सरपाटिल यांनी तीन वेळा तर सुनित लिंबोरे यांनी दोन वेळा ही गड सर केला.

स्वांतत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून राजगडवर आले. या घटनेला १७ ऑगस्ट रोजी ३५६ वर्षे पूर्ण होत आहेत. ही ‘गरुडझेप’ व देशाला मिळालेले ‘स्वातंत्र्य’ या दोन्ही घटना सर्वांसाठी गर्वाच्या आहेत. महाराज राजगडावर परतले म्हणून ‘राजगड’ आणि देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन म्हणून ‘७५’ वेळा सर करण्याचे नियोजन ठरले.

- अशोक सरपाटील, आयोजक

पाली दरवाजात वाऱ्याचा व कोसळणारा धबधब्याचा आवाज व धुक्यामध्ये अदृश्य झालेली वाट भयानकता सांगत होती. गडावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे जणू काही दुर्ग राजाला पहाटेचा अभिषेक सुरु होता. मी मनामध्ये ठरवलं होतं की, सर्वात पहिल्यांदा जाऊन मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर डोकं टेकून नतमस्तक होणार आणि ते केलं सुद्धा. खूप प्रेरणादायी अनुभव होता.

- विनायक दारवटकर, आयोजक

Web Title: Durgaraj Rajgad As Many As 75 Times

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneRajgad