कोरोना'च्या काळात पुणे विद्यापीठात सुरु आहे पाहुण्यांचा मुक्काम: विद्यापीठ प्रशासनाने काढला 'हा' आदेश

During the time of Corona guests are staying at Pune University without permission
During the time of Corona guests are staying at Pune University without permission

पुणे :'एकीकडे 'कोरोना'चा धोका वाढत असताना दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी, कर्मचार्यांचे पाहुणे बिनधास्त येऊन राहात आहेत. यातून 'कोरोना'चा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने, विद्यापीठ आवारात विनापरवानगी कोणालाही मुक्कामासाठी किंवा भेटण्यासाठी बोलवू नका असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने काढले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे विद्यापीठात अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे निवासस्थान आहेत. लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून विद्यापीठाचे तिन्हीही गेट बंद करून येण्याजाण्यावर निर्बंध आणले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नियमांमध्ये शिथिलता आणले आहेत. तसेच विद्यापीठ सोडून गेलेले अनेक जण सह कुटुंब विद्यापीठात परत रहायला आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठातील अधिकारी  कर्मचारी यांचे नातेवाईक मुक्कामी येत आहेत, तसेच काही जण भेटण्यासाठी येत आहेत. त्यामुळे परिसरात रहाणाऱ्यांना भिती वाटत आहे. 

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, "विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचार्यांना वेळोवेळी प्रशासनास सहकार्य केले आहे. आपल्या सामुहिक प्रयत्नामुळे आजपर्यंत विद्यापीठ परिसर हा करोनामुक्‍त राहिला आहे. असेच प्रयत्न पुढे आवश्यक असल्याने विद्यापीठातील रहिवाशांकडे पाहुणे हे कोणत्या भागातून येतात व त्यांची आरोग्य विषयक स्थिती काय आहे याची त्वरित पडताळणी करणे सुरक्षा विभागास शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत नकळतपणे विद्यापीठ रहिवाशांचे आरोग्य व सुरक्षा धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे आगामी काळात कुणालाही विद्यापीठात बोलावू नका. अत्यावश्‍यक कामासाठी पाहुणे विद्यापीठ आवारात आलेच तर त्यांना प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com