गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी ‘आर नॉट‘ या पद्धतीचा वापर केला जातो. कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा आपण वापर केला. पण, तो वापर न करता कोरोनाचं इंन्फेक्शन झालेला पेशंट तसाच समाजात फिरत राहिल्यास तो एका महिन्यात 465 जणाना इंन्फेक्ट करतो.

पुणे : मराठी लोकहो, आपण राज्यात कोरोनाला रोखतोय. कारण, मार्चमध्ये कोरोनाचं इंन्फेक्शन झालेला एक पेशंट चार जणांना इंन्फेक्ट करायचा. तो 83 दिवसांनंतर आता 1.23 लोकांना इंन्फेक्ट करतोय. आता हे प्रमाण एकपेक्षा कमी करणं आपल्यापुढचं चॅलेंज आहे.

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी ‘आर नॉट‘ या पद्धतीचा वापर केला जातो. कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा आपण वापर केला. पण, तो वापर न करता कोरोनाचं इंन्फेक्शन झालेला पेशंट तसाच समाजात फिरत राहिल्यास तो एका महिन्यात 465 जणाना इंन्फेक्ट करतो. मार्चअखेपर्यंत महाराष्ट्रात ‘आर नॉट‘ 4 होता. म्हणजे एका कोरोनाच्या पेशंटकडून किमान चार जणांना इंन्फेक्शन होत असे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आपण लॉकडाऊन केलं. गर्दीची सगळी ठिकाणं बंद केली. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास निर्बंध घातले. या उपाययोजनांमुळे हे 4 वरून हा ‘आर नॉट‘ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 2.5 पर्यंत कमी आला. आता हे प्रमाण एकपेक्षा कमी करण्याचं चॅलेंज आपल्यापुढे आहे. कारण, तसं झालं तर करोनाचा एक रुग्ण एकाच व्यक्तीला इंन्फेक्ट करेल. इतर व्यक्ती त्यापासून सुरक्षित रहातील आणि पर्यायाने कोरोनाबाधितांचे प्रमाण वेगाने कमी होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.   

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

कोरोनाबाधीतांची संख्या दुप्पट होण्याचे दिवस वाढल
राज्यातील कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्या वाढीचा वेग नियंत्रित करण्यात राज्याला यश आले आहे. यापूर्वी दर आठवड्याला हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या गेल्या आठवड्यात 246 रुग्णांनी वाढली. त्यामुळे राज्यातील रुग्ण दुपटीचा वेग वाढल्याचे (डबलिंग रेट) स्पष्ट होते. गेल्या आठवड्यात डबलिंग रेट 11.7 दिवस होता. तो आता 17.5 दिवस झाला.  

- Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A corona patient infects 1.23 people