esakal | पुणे : बाजारपेठेचे सीमोल्लंघन
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Festival News

पुणे : बाजारपेठेचे सीमोल्लंघन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : झेंडूच्या फुलांची रास, आपट्याच्या पानांची पेंडी, रांगोळीचे ढीग, रंगबिरंगी कपड्यांनी सजलेली दुकाने आणि अगरबत्तीच्या सुगंधी सुवासाने दरळवळलेल्या बाजारपेठेने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले. कोरोनाच्या वाईट काळाकडून स्वच्छंदी मुक्त वातावरणाची चाहुल सणासुदीच्या खरेदीने सजलेल्या बाजारपेठेत पाहायला मिळाली.

गुरुवारी शहरातील सर्वच बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळाल्या. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुले, आपट्याची आणि आंब्यांची पाने, रांगोळी आदींनी बाजारपेठेत नवचैतन्य आणले होते. कपडे, घरगुती साहित्य, महिलांसाठीचे श्रुंगारसाहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली. तुळशीबागेतील विक्रेते अभिषेक घोलप म्हणाले,सणाच्या निमित्ताने नवीन मालाची खरेदी केली आहे. मागील आठवड्यापासूनच खरेदीसाठी लोक येत आहे. लॉकडाउननंतर प्रथमच व्यवसाय स्थिरस्थावर होत आहे. मात्र लॉकडाउनपुर्वीची स्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.’’ तर महात्माफुले मंडईत झेंडूची फुले विकणारे सुमीत शास्त्री म्हणाले,‘‘लॉकडाउनच्या आधी येथे झेंडूच्या फुलांची रास लागायची. यंदा जरी अनलॉक असले तरी खरेदी जरा विचारानेच केली आहे. नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. मात्र कोरोनापुर्वीसारखा नाही.’’ शहर आणि उपनगरातील सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांनी पूजेच्या किंवा सणाच्या खरेदीबरोबरच कपडे, दागिने, गृहसाहित्याच्या खरेदीलाही पसंती दर्शवली.

हेही वाचा: राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

"मंदिरे उघडल्यामुळे तसेच दसऱ्याच्या निमित्ताने देवपुजेच्या साहित्याची खरेदी वाढली आहे. देवीचे ओटीभरण, कुंकू, तोरणे आदींनाही भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे."

- नियाजअहमद अख्तर, देवपूजा साहित्याचे विक्रेते

"मागल्या वर्षी काहीच धंदा झाला नाही. यंदा बाजारात आपट्याची आणि आंब्याची पाने घेऊन आले आहेत. लोक घेण्यासाठी येत आहेत. मात्र पाहिजेतेवढी विक्री होत नाही."

- सोन्याबाई पवार, विक्रेत्या

loading image
go to top