
Pune News
Sakal
पुणे : अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार विभागाने दसऱ्यानिमित्त अनोखी भेट दिली आहे. अशा सोसायट्यांना आता निवडणूक घेण्यासाठी सहकार खात्यामध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण सहकार खात्याकडून ‘महासहकार’ या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक परवानगीपासून ते मतदारयाद्या अंतिम करण्यापर्यंतची सर्व कामे सोसायटी कार्यालयात बसून, तसेच सभासदांना घरात बसून निवडणुकीवर लक्ष ठेवता येणार आहे.