कात्रजमधील नवीन गॅसदाहिनी शेडअभावी धूळखात | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas burner

कात्रजमधील नवीन गॅसदाहिनी शेडअभावी धूळखात

कात्रज : कात्रजच्या स्माशानभूमीत महापौर निधीतून बसविण्यात आलेली विद्यूत गॅसदाहिनी धूळखात पडल्याचे दिसून येत आहे. तिचा कुठल्याही प्रकारचा वापर नसल्याने ६५ लाख रुपयांचा निधी वापरुन गॅसदाहिनी कशासाठी बसविण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरात विविध ठिकाणी गॅस दहिण्याच्या कामासाठी महापौरांच्या निधीतून जवळपास सव्वादोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यामधून कात्रज, कोथरूड, हडपसर आणि अन्य एका ठिकाणी गॅस दाहिनी बसविण्याचे काम करण्यात येणार होते.

हेही वाचा: नसरापूर मधील मुख्य रस्त्याकडे सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नव्या गॅस दहिनीची कोणतीही आवश्यकता नव्हती. सद्या स्माशानभूमीची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी निधीची गरज आहे. गॅसदाहिनीऐवजी अन्य गोष्टींवर प्रशासनाने खर्च करण्याची गरज होती. हे मुख्य खात्याचे काम असून एकप्रकारे महापौर निधीचा अपव्यय आहे. ज्या तत्परतेने गॅसदहिनीचे काम केले त्या तत्परतेने शेड का उभे करण्यात आले नाही. विद्युत विभागांकडे यासाठी विचारणा केल्यास निविदेमध्ये शेडचा उल्लेखच करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात येते

- वसंत मोरे, नगरसेवक

हेही वाचा: घाटात घोंगावतोय मृत्यू! जंगलवाडीकडे बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

सद्यस्थितीत ही गॅसदाहिनी चालू करण्यास कुठलीही अडचण नाही. परंतु पाऊस(rain) आल्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण थांबलेलो आहोत. वार्डस्तरीय निधी वापरून याठिकाणी शेड बांधणीचे काम करण्यात येणार आहे. क्षेत्रिय कार्यालयाच्या अभियंत्याशी याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच शेडबांधणी करून गॅसदाहिनी सुरु करण्यात येईल.

- श्रीनीवास कंदुल, अभियंता विद्युत विभाग

Web Title: Dust Due To Lack Of New Gas Burn Shed In Katraj At Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top