

Construction Chaos in Pune: Dust from Road Works Troubles Residents
sakal
पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, तसेच साखळीपीर तालीम चौक परिसरात सांडपाण्याची वाहिनी टाकण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, मातीचे ढिगारे आणि मुरूम यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे.