

डीव्हीसीएचा पारसी जिमखाना संघावर डावाने विजय
पुणे, ता. २० ः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या सुपरलिग क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीने (डीव्हीसीए) पारसी जिमखाना संघावर डाव आणि ३१ धावांनी विजय मिळविला.
या लढतीत पारसी जिमखान्याचा पहिला डाव १६१ धावांत आटोपला त्यांच्या सिद्धान्त लाडेने १०४ चेंडूंत बारा चौकारांसह ८१ धावांची खेळी केली अजिंक्य पुजारीने पाच तर श्रावण राठोडने चार गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना वेंगसरकर अकादमीने २६४ धावा करून पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली. यावेळी श्रावण राठोडने २२८ चेंडूंत २३ चौकारांसह १५० धावांची खेळी केली. रुद्र कोरेने पाच गडी बाद केले. अजिंक्य पुजारीने तीन तर अर्जुन गायकवाड, प्रज्योत गुंडाळेने प्रत्येकी दोन गडी बाद करताना केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे पारसी जिमखान्याचा दुसरा डाव ७२ धावांतच आटोपला.
संक्षिप्त धावफलक :
पारसी जिमखाना संघ - पहिला डाव - सर्वबाद १६१ (सिद्धान्त लाडे ८१, राजवीर जुनावणे २०, अजिंक्य पुजारी ५-१८, श्रावण राठोड ४-२१) आणि दुसरा डाव - सर्वबाद ७२ (रुद्र कोरे १९, अजिंक्य पुजारी ३-११, प्रज्योत गुंडाळे २-१६, अर्जुन गायकवाड २-२२) पराभूत विरूद्ध दिलीप वेंगसरकर अकादमी - पहिला डाव - सर्वबाद २६४ (श्रावण राठोड १५०, रुद्र भोसले २८, रुद्र कोरे ५-६६).
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.