esakal | हायपरलूप जगात कोठेही दाखवा; अजित पवारांचा फडणवीसांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Dy Cm Ajit Pawar speak About CAA in Pune

हायपरलूप प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही. परंतु जगात असा प्रकल्प कोठे झाल्याचे दाखवा. आपण जाऊ, त्याच्यात बसू.' मुंबईवरून 15 मिनिटांत एवढ्याशा बोगद्यातून पुण्यात... माणूस त्यात पूर्ण जसा बसला तसाच उतरला पाहिजे. त्याला रुबीला तर न्यायचे नाही ना? अशी मिश्किल टिप्पणी करीत अजित पवार यांनी केली.

हायपरलूप जगात कोठेही दाखवा; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हायपरलूप प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही. परंतु जगात असा प्रकल्प कोठे झाल्याचे दाखवा. आपण जाऊ, त्याच्यात बसू.' मुंबईवरून 15 मिनिटांत एवढ्याशा बोगद्यातून पुण्यात... माणूस त्यात पूर्ण जसा बसला तसाच उतरला पाहिजे. त्याला रुबीला तर न्यायचे नाही ना? अशी मिश्किल टिप्पणी करीत अजित पवार यांनी केली. त्यांनी ही योजना चांगली असल्यास जरूर विचार करू. परंतु त्याचे तिकीट किती असेल, विमानापेक्षा कमी असले पाहिजे, असे सांगत पवार यांनी हायपरलूप प्रकल्प गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

देशात नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. राज्यात या कायद्यावरून कोणाला त्रास होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तीच आमची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमचे बरे चालले आहे, चालू द्या... 
मंत्री अशोक चव्हाण यांनी महाआघाडीचे सरकार हे मल्टिस्टार सिनेमा असल्याचे वक्तकव्य केले होते. याबाबत पवार म्हणाले, राज्य सरकार स्थापन करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम कार्यक्रम ठरला आहे. शिळ्या कढीला कशाला ऊत आणता? आमचे बरे चालले आहे, चालू द्या. शब्दाने शब्द वाढतो. कोणी काही वक्त व्य केले तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मला तरी आता कोणती समस्या माझ्याकडून निर्माण करायची नाही. 

पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा

मुळशी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी विचार 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु नवीन धरणासाठी जागा नाही. लवादाच्या निर्णयानुसार करार झालेले आहेत. त्यात कोण किती पाणी वापरायचे हे ठरलेले आहे. मुळशी धरणातील पाण्यातून पिक अवरमध्ये वीज निर्मिती करावी. उर्वरित काळात सोलर, थर्मल, विंड आणि न्युक्लि यरची वीज वापरून ते पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारचा पिण्याच्या पाण्यास प्राधान्यक्रम असेल. 

विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं 

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नापवर चर्चा करणार 
पंकजा मुंडे यांच्या मराठवाड्यातील पाणीप्रश्नाणवर लाक्षणिक उपोषणाबाबत पवार म्हणाले, त्या राज्य सरकारमध्ये मंत्री आणि मराठवाड्याच्या प्रमुख होत्या. त्यांच्याच पक्षातील गिरीश महाजन पूर्वी जलसंपदा मंत्री होते. परंतु मुंडे यांच्या मागणीबाबत जलसंपदा मंत्री त्यांच्याशी चर्चा करतील. या बैठकीला मराठवाड्यातील आठ पालकमंत्र्यांनाही बोलावून त्यांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल.