पुणे - पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा वेळ वाचावा व विमानतळावरील प्रस्थानाची प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी याकरिता मंगळवारपासून (ता. १) ‘ई-बोर्डिंग’ पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली..‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’च्या विशेष पुढाकारातून सुरू झालेल्या या नव्या सुविधेमुळे आता इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याची पारंपरिक पद्धत बंद करण्यात आली आहे. आता प्रवाशांना ‘ई-बोर्डिंग’ सुविधा उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान प्रवाशांना इमिग्रेशनसह विविध टप्प्यांवर कागदपत्रांची वारंवार तपासणी करावी लागते. या प्रक्रियेत प्रवाशांचा बराच वेळ रांगेत जातो..मात्र, आता ई-बोर्डिंगची ही सर्व प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित करण्यात आली आहे. प्रवाशांना केवळ त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या ई-बोर्डिंग पासच्या माध्यमातून प्रस्थानाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान होणारी कागदपत्रांची प्रत्यक्ष हाताळणी टळेल आणि मानवी चुका टाळण्यासही मोठी मदत होईल.पुणे विमानतळावरून सध्या दुबई व बँकॉक या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाणे होत आहेत. परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे..प्रवासाचा नवा टप्पाप्रत्यक्ष शिक्का मारण्याची आणि कागदपत्रे तपासण्याची वेळखाऊ प्रक्रिया थांबल्याने इमिग्रेशन काउंटरवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, विमानतळावरील प्रवासी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार असून, वेगवान, स्मार्ट आणि पेपरलेस आंतरराष्ट्रीय प्रवासाचा नवा टप्पा पुण्यात सुरू झाला आहे..‘ई-बोर्डिंग’ सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. प्रक्रिया अधिक सोपी करणे आणि विमानतळावरील प्रवासाचा अनुभव आरामदायी करणे, हा या सुविधेमागील मुख्य उद्देश आहे.- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.