पुणे - खरीप हंगाम २०२५- २६ साठी ई- पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत सर्व्हरवर येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना सकाळी ऑफलाइन पद्धतीने पीक पाहणी करून रात्री चांगल्या नेटवर्कवेळी नोंदणी पूर्ण करण्याचे आणि डेटा अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.