प्रत्येक गावात देशी बियाण्यांची बँक तयार व्हावी : बीजमाता राहिबाई

each village should have seed bank says Rahibai Popere
each village should have seed bank says Rahibai Popere

आळेफाटा (पुणे) : "पैशांची बँक प्रत्येक गावात आहे, तशी प्रत्येक गावात देशी बियाण्यांची बँक तयार झाली पाहिजे" असे मत बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी, राजुरी (ता. जुन्नर) येथे आज (ता. २०) विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

राजुरी येथे (ता. २०) विद्या विकास मंदिर विद्यालयात अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजुरी गावचे सरपंच एम. डी. घंगाळे, संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील - औटी, बबन हाडवळे, प्रदीप डुंबरे, नानाभाऊ कणसे, मनोज हाडवळे, मुख्याध्यापक शिवाजी लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील शिक्षिकांनी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा साडी - चोळी देऊन सन्मान केला.

यावेळी बोलताना बीजमाता राहिबाई पोपेरे म्हणाल्या की, जीवनात मोठे होण्यासाठी पैसे लागत नाहीत तर समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी लागते. 'जुनं ते सोनं' या उक्तीप्रमाणे मातीच्या मडक्यात, बांबूच्या कणगीत राख लावून देशी बियाण्याची पारंपरिक पद्धतीने साठवणूक केली. बाजारात पैसे देऊन विष विकत घेण्यापेक्षा, घरासमोर परसबाग करून सेंद्रिय भाजीपाला पिकवा. आता जवळपास तीन हजार महिलांना सोबत घेऊन देशी बियाणे संवर्धनाचे काम सुरु केले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच प्रेरणा मिळावी या हेतूने बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील - औटी यांनी, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जी. के. औटी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com