esakal | आजी-नातवाच्या नात्याला कलंक, लेकराला विहिरीत फेकून दिले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Grandmother killed her grandson at Indapur Pune

पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी रविंद्र जराड हे पत्नी गौरी व मुलगा वेदांत यांच्यासह 3 जानेवारीला आपल्या दुचाकीवरून सासरी तनपुरवाडीस आले होते. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी सासुरवाडीस मुक्काम केला. पुढे होत्याचं नव्हतं झालं...

आजी-नातवाच्या नात्याला कलंक, लेकराला विहिरीत फेकून दिले अन्...

sakal_logo
By
संदेश शहा

इंदापूर : आपल्या दीड वर्षाच्या नातवास विहिरीत फेकून देऊन त्याचा निर्दयीपणे खून केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सुलोचना सदाशिव तनपुरे (वय 50, रा. तनपुरवाडी - व्याहळी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना अटक करून इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. हा प्रकार 4 जानेवारीला पहाटे साडेचार वाजता घडला.

निर्भया बलात्कार प्रकरण : अन् विनय कुमारने भिंतीवर डोकं आपटलं...

यासंदर्भात आरोपीचे जावई रविंद्र महादेव जराड ( रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या सहकार्याने आरोपीस 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता इंदापूर बसस्थानकात अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी रविंद्र जराड हे पत्नी गौरी व मुलगा वेदांत यांच्यासह 3 जानेवारीला आपल्या दुचाकीवरून सासरी तनपुरवाडीस आले होते. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी सासुरवाडीस मुक्काम केला. 4 जानेवारीला सासू सुलोचना हिने पहाटे साडेचार वाजता झोपेत असलेल्या नातवास उचलून घेऊन घराशेजारी असलेल्या विहिरीत टाकून त्याचा खून केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे ग्रामीण गुन्हे शाखा पथक इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना या खून प्रकरणातील आरोपी सुलोचना ही इंदापूर बस स्थानकात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या पथकाने महिला पोलिस अंमलदार यांच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी तिला इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलिस हवालदार अनिल काळे व रविराज कोकरे, पोलिस नाईक प्रवीण मोरे,महिला पोलिस हवालदार पी. जी. कांबळे यांनी भाग घेतला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे करत आहेत.

loading image