

Jal Jeevan Mission Projects Worth Rs 781 Crore Delayed in East Haveli
लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ७८१ कोटी रुपयांहून अधिक निधीच्या जलजीवन मिशन योजनांना प्रशासकीय दिरंगाई आणि कामांच्या संथगतीचा फटका बसला आहे. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह १३ गावांतील योजनांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. तरडे आणि वळती ही दोन गावे वगळता अन्य गावांतील नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नसल्याने या योजनांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.