पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक विस्कळित

पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक विस्कळित
Published on

‘पूर्व द्रुतगती’वर अपघात;
सात तास वाहतूक रखडली

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता . ८ : घाटकोपरजवळ ट्रेलरच्या अपघातामुळे शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर सुमारे सात तास कोंडीमुळे वाहतूक रखडली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दक्षिण वाहिनीवर घाटकाेपर ते जाेगेश्वरी-विक्राेळी लिंक राेडपर्यंत रांगा लागल्या हाेत्या. क्रेन मागवून अपघातग्रस्त ट्रेलर हटवल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

‘व्ह्यूज बाय अदाणी’ निवासी संकुलाजवळ भरधाव ट्रेलरने दुभाजकाला धडक दिली. सकाळी झालेल्या अपघातामुळे पूर्व उपनगरातून मध्य आणि दक्षिण मुंबईकडे वाहतुकीचा वेग मंदावला हाेता. वाहतूक पोलिसांनी समाजमाध्यमांवरून रमाबाई ब्रिज (विक्रोळी) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक मंदावल्याची सूचना दिली हाेती. तसेच वाहतुकीच्या पर्यायी मार्गांच्या व्‍यवस्थापनासाठी कर्मचारी तैनात केले हाेते, अशी माहिती वाहतूक पाेलिसांनी दिली. पूर्व द्रुतगती मार्ग हा मुंबईची प्रमुख मार्ग आहे. पूर्व उपनगरांना शहराशी जाेडणाऱ्या या मार्गावर गर्दीच्या वेळी अपघात किंवा वाहन बंद पडून नेहमीच कोंडी होत असल्याची नाराजी प्रवाशांनी केली. दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळेत वाहतुकीच्या गाेंधळाचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com