ECHS लाभार्थ्यांना पॉलिक्लिनिकच्या परवानगीशिवाय घेता येणार डायलिसिसचा उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ECHS

ECHS लाभार्थ्यांना पॉलिक्लिनिकच्या परवानगीशिवाय घेता येणार डायलिसिसचा उपचार

पुणे : माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजना (इसीएचएस) विभागाच्या वतीने डायलिसिसची गरज असलेल्या इसीएचएस लाभार्थ्यांना पॉलिक्लिनिकशिवाय कोणत्याही रुग्णालयातून डायलिसिसचे उपचार घेता येणार आहे. यासाठी त्यांना नेमण्यात आलेल्या इसीएचएस पॉलिक्लिनिकची परवानगी देखील घेण्याची गरज नाही. याबाबतचे परिपत्रक नुकतेच इसीएचएसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

एखाद्या व्यक्‍तीची मूत्रपिंड निकामी झाल्यास त्या व्यक्तीला डायलिसिसची गरज असते आणि अशा रुग्णांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपचार आहे. कोरोना काळात इसीएचएसद्वारे नेमण्यात आलेले अनेक रुग्णालये कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत होते. परिणामी डायलिसिसची गरज असलेल्या इसीएचएस लाभार्थ्यांना उपचार घेण्यात अडचणी येत होत्या.

हेही वाचा: Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

त्यामुळे इसीएचएस लाभार्थ्यांना या उपचारात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये या अनुषंगाने त्यांना कोणत्याही रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेता येईल. पूर्वी प्रमाणे इसीएचएस लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित इसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये जाऊन परवानगी घेण्याची ही गरज नाही. त्याचबरोबर यासाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा परतावा देखील त्यांना मिळेल. अशी माहिती इसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी दिली.

loading image
go to top