

SPU26B06686
पारनेर ः न्यू इंग्लिश स्कूलमधील मुलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक आकाश कंदील व पणत्यासह विद्यार्थी व कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
कार्यशाळा उत्साहात
पारनेर, ता. १ : पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये पर्यावरणपूरक आकाश कंदील व पणत्या बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. यात पाचवी ते आठवीच्या सुमारे 280 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
''प्रदूषणमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक दिवाळी'' हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता व हस्तकौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी विद्यार्थ्यांना रंगीत कागदांपासून आकर्षक आकाशकंदील व शाडूच्या मातीपासून विविध आकारांच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. सोप्या व सुलभ पद्धतीने प्रत्येक कृती समजावून सांगत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निर्मितीसाठी प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पकतेने वापर करून सुंदर आकाश कंदील व पणत्या तयार केल्या. स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
प्राचार्य कचरू शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थी व कलाशिक्षक कवडे यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी यंदाची दीपावली प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपप्राचार्य संतोष इंगळे, पर्यवेक्षक अजित दिवटे आदी उपस्थित होते.
------
कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे हे नेहमीच आमच्यासाठी आनंददायी व नावीन्यपूर्ण उपक्रम घेतात. त्यांनी आम्हाला आकाशकंदील व पणत्या अतिशय सोप्या पद्धतीने शिकविल्या. या कार्यशाळेत आम्ही स्वतः तयार केलेले आकाशकंदील व पणत्याच यंदाच्या दिवाळीत वापरणार आहोत.
- वैष्णवी पठारे, इयत्ता सातवी.
-------
काही आकाश कंदील आम्ही गोरगरीब कुटुंबांना भेट म्हणून देणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त आकाश कंदील बनवले आहेत.
- ज्ञानेश्वर कवडे कलाशिक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.