करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेत ''मेरी लाईफ'' कार्यशाळा संपन्न
KRK26B03779
करकंब (ता. पंढरपूर) ः येथील रामभाऊ प्रशालेत आयोजित पर्यावरण पूरक मेरी लाइफ कार्यशाळेप्रसंगी हेमंत कदम, महादेव पुजारी व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी.
रामभाऊ जोशी प्रशालेत मेरी लाइफ कार्यशाळा
सामाजिक वनीकरण विभाग, राष्ट्रीय हरित सेनेचा संयुक्त उपक्रम
करकंब, ता.१२ : सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने मेरी लाइफ कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये सोलापूर येथील सामाजिक वनीकरण विभागातील पक्षीप्रेमी संजय भोईटे यांनी रासायनिक रंगांचे दुष्परिणाम सांगून नैसर्गिक रंगांचे महत्व विशद केले. यावेळी त्यांनी पळस, आंबा, झेंडू, शेवंती, चाफा, शंकेश्वरा, काटेसावर, पांगरा या झाडांच्या फुलांपासून व मेहंदी, हळद, बीट यापासून नैसर्गिक रंग कसे तयार करावे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
याशिवाय सोलापूरचे प्रसिद्ध गणपती शिल्पकार आशिष माशाळे यांनी मातीपासून पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेतली. यावेळी हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे आकर्षक गणपती तयार केले. उपस्थित सर्वांना नैसर्गिक रंग वापरण्याची व पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. यावेळी पंढरपूर सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री. शेंडे, वनपाल श्री.कळसाईत, वनरक्षक सौ.आटपाडकर, सौ.अथने, प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, हरित सेना समन्वयक महादेव पुजारी उपस्थित होते.

