ED Action : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी आमदाराची ईडीकडून 26 कोटींची संपत्ती जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार अनिल भोसले यांची संपत्ती ईडीकडून जप्त
ED
EDesakal

पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे ईडीने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार अनिल भोसले यांची 26 कोटी 26 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

या प्रकरणामध्ये अनिल भोसले यांना मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील माजी आमदार अनिल भोसले यांच्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 26 कोटी 26 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

तर शिवाजीराव बँक भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींवर यापुर्वीच गुन्हा दाखल झाला होता. शिवाजीराव भोसले बँकेतील ठेवीदारांची 71 कोटी रुपयांची फसवणूक तत्कालीन संचालकांनी केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.

ED
सेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची पक्षातून हकलपट्टी होणार? येत्या दोन दिवसात कारवाई Chinchwad Bypoll

तर आता ईडीनेही अनिल भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भोसले यांनी बनावट कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्यामाध्यमातून ठेवीदारांचे पैसे त्यांनी अन्यत्र वळवले होते. यामुळे बँक अडचणीत आली आहे.

ED
Video Viral : "बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना ठार केलं असतं", व्हिडीओमुळे खळबळ

ईडीकडून कारवाई करण्यात आलेळे भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. त्यामुळे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल भोसले यांनी त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधून काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले.

ED
Sanjay Raut : शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणी संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com