सेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची पक्षातून हकलपट्टी होणार? येत्या दोन दिवसात कारवाई |Chinchwad Bypoll: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad Bypoll

सेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची पक्षातून हकलपट्टी होणार? येत्या दोन दिवसात कारवाई Chinchwad Bypoll

Chinchwad Bypoll: भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच चालू होती मात्र राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली.

शिवसेनेचे इच्छूक असलेले राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान राहुल कलाटे यांची समजूत काढण्यासाठी अजित पवार यांच्या पासून ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

या सर्वांचा शब्द डावलून राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहिला मिळत आहे.

मात्र आता राहुल कलाटे यांच्यावर पक्ष एक,दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी शुक्रवारी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन वरून मनधरणी केली होती. काल दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.

त्या आगोदर माघार घेण्यासाठी सकारात्मक होते मात्र कार्यकर्त्यांनसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मागे न घेण्याची निर्णय घेतला त्यानंतर तातडीने सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

कलाटे यांच्या सोबतच त्यांना सहकार्य करणाऱ्या नगरसेवकांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे सचिन आहिर यांनी सांगितले.