
एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी आज खडसेंच्या विरोधात केस लढवत असलेले अंजली दमानियाचे वकिल ऍड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार होते.
पुणे Pune News : पुण्यातील ख्यातनाम वकील ऍड. असीम सरोदे यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयातून (ईडी) फोन करण्यात आला होता. त्यामुळं 'ईडी'कडून ऍड. सरोदी यांची चौकशी होणार की काय या संदर्भात आज, सकाळपासून चर्चा सुरू होती. पण, सायंकाळपर्यंत एक धक्कादायक माहिती समोर आली. 'ईडी'कडून कागदपत्रे घेण्यासाठी पाठवण्यात आलेली व्यक्ती 'ईडी'ची नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऍड. असीम सरोदे यांनी 'ईडी'च्या कारभारावरच बोट ठेवले आहे.
आणखी वाचा - UPSC परीक्षेची तारीख निश्चित
एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी आज खडसेंच्या विरोधात केस लढवत असलेले अंजली दमानियाचे वकिल ऍड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार होते. मात्र, ईडीनं कार्यालयीनं कर्मचाऱ्याला न पाठवता दूसऱ्याच व्यक्तीला पाठवल्याची माहिती ऍड. असीम सरोदे यांनी मीडियाशी बोलताना दिली. कार्यालयात मीडियाचे प्रतिनिधी जमले असल्याने, संबंधित व्यक्ती कागदपत्रे न घेताच रिकाम्या हाताने परतल्याचे सरोदे यांनी सांगितले.
आणखी वाचा - 'ईडी'चा रोख आता दुसऱ्या संशयास्पद घोटाळ्याकडे
याबाबत ऍड. असीम सरोदे म्हणाले, 'ईडी'नं कार्यालयानं अधिकारी न पाठवता दूसऱ्याच व्यक्तीला कागदपत्रे घेण्यासाठी पाठवलं. 'ईडी'सारख्या संस्थेनं अशा व्यक्तीला कागदपत्र घेण्यासाठी पाठवणं किती योग्य आहे? मी अधिकारी नाही मी फक्त कागदपत्र घ्यायला आलोय, असं आलेल्या कर्मचाऱ्यानचं सांगितलं. या विरोधात 'ईडी'च्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.' 'ईडी'नं नियमानुसार काम करायला हवं. आज झालं ते बेजबाबदारपणे केलेलं काम होतं. कागदपत्रांच्या झेरॉक्सचे पैसे 'ईडी'कडून घेणार, असेही ऍड. सरोदे यांनी सांगितलं.