esakal | EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त

EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन नियंत्रण कायदा (Foreign Exchange Management Act - FEMA) 1999 अंतर्गत आज सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: हाँगकाँगचं लोकशाहीवादी वृत्तपत्र पडणार बंद; चीन सरकारवरील टीका भोवली

ही मालमत्ता अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी FEMA चं उल्लंघन करत ठेवलेल्या फॉरेन सिक्युरिटीज किंवा मालमत्तेच्या समकक्ष मूल्याच्या रूपात जप्त केले आहेत. यामध्ये भारताबाहेर असणारी फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.

हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी दोन भिन्न लशी प्रभावी; WHOच्‍या शास्त्रज्ञांचा दावा

याआधी फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला ईडीने ताब्यात घेतले होतं. ईडीने अविनाश भोसलेंच्या ऑफिसवर छापा देखील टाकला होता. त्या दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेली चौकशी मध्यरात्री पर्यंत सुरू होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले मोठे बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमा संबंधीच्या प्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती आहे. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमित भोसलेला ताब्यात घेऊन मुंबईत नेले होते. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) 10 फेब्रुवारी रोजी तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती.

अविनाश भोसले हे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याची चर्चा असते. भोसले यांचा पुण्यात आणि मुंबईत बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच देशभर त्यांची कंपनी पायाभूत क्षेत्रात काम करते. ईडीच्या नजरेत त्यांचे कोणते व्यवहार आले, याचा खुलासा नंतरच होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे

loading image
go to top