

ED Raids in Thane Baramati and Nashik Over Suspected Illegal Egg Collection Racket Cash Worth 29 Lakh Seized
sakal
पुणे : गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे अवैध मार्गाने स्त्रीबीज काढून घेणाऱ्या रॅकेटवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ठाणे, बारामती आणि नाशिकमधील रुग्णालये व आयव्हीएफ केंद्रांसह १० ठिकाणी छापे टाकून २९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.