
Pune News : सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बी.एड, दृश्यकला पदवी प्रथम वर्ष आणि एम.पी.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी २०२३ प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना १८ मार्च पर्यंत ऑनलाइन नोंदणी अर्ज करता येणार आहे. दृश्यकला पदवी प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमएएच-एएसी सीईटी २०२३’ प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ९ ते १८ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. तर याच कालावधीत शुल्क भरून अर्ज निश्चित आणि परीक्षा केंद्र निश्चित करायचे आहे, असे सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेश परीक्षेचे नाव : सामाईक प्रवेश परीक्षांची तारीख : ऑनलाइन नोंदणीची अर्ज कालावधी
बी.एड : २३ ते २५ एप्रिल : ९ ते १८ मार्च
एम.पी.एड : २३ एप्रिल : ९ ते १८ मार्च
दृश्यकला पदवी (प्रथम वर्ष) : --- : ९ ते १८ मार्च