व्यापक संधी असलेल्या अभियांत्रिकी शाखा (भाग २)

स्मिता दोडमिसे 
शुक्रवार, 12 जुलै 2019

मेकॅट्रॉनिक्‍स ही अभियांत्रिकीची अशी विद्याशाखा आहे, जिच्यात विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रीकरण होते. आज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये रेव्होल्यूशन- ४ कडे प्रवास करत आहोत. यामध्ये मेकॅट्रॉनिक्‍स आणि रोबोटिक्‍स या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला येत्या पाच वर्षात मिळू शकेल. मेकॅट्रॉनिक्‍स अभियंते सेन्सर्स आणि ॲक्‍युएटर्सचे डिझाईन करतात.

आपण अभियांत्रिकीच्या मागणी असलेल्या ऑफ बीट शाखा पाहू. 
१. मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी -

मेकॅट्रॉनिक्‍स ही अभियांत्रिकीची अशी विद्याशाखा आहे, जिच्यात विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रीकरण होते. आज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये रेव्होल्यूशन- ४ कडे प्रवास करत आहोत. यामध्ये मेकॅट्रॉनिक्‍स आणि रोबोटिक्‍स या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला येत्या पाच वर्षात मिळू शकेल. मेकॅट्रॉनिक्‍स अभियंते सेन्सर्स आणि ॲक्‍युएटर्सचे डिझाईन करतात. 

करिअर संधी - ऑटोमोबाइल, तेल आणि वायू, खाणकाम, परिवहन, संरक्षण, रोबोटिक्‍स, एअरोस्पेस आणि एव्हिएशन अशा क्षेत्रांमध्येही त्यांना काम करता येते. नौदल, हवाई दल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अशा संस्थांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच  ऑटोमेशन, इंन्सुमेंट्रेशन, एंड  कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रिकल सिस्टिम, मॅकेनिकल सिस्टिम असलेल्या कंपन्यामध्ये मागणी असते.

२. एरोस्पेस इंजिनिअरिंग - एरोस्पेस इंजिनिअरिंग हे मागणी असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे ज्यामध्ये विमान, क्षेपणास्त्रे, उपग्रह, विमाने, लढाऊ जेट्‌स इत्यादींचा विकास, संशोधन आणि बांधणी  यांचा समावेश आहे. एरोस्पेस इंजिनिअर्ससाठी  विमान क्षेत्रातील आणि संरक्षण क्षेत्रातील नोक-या उपलब्ध आहेत. 

करिअर संधी - काही सरकारी संस्थांमध्ये एचएएल, इस्रो आणि डीआरडीओ आहेत. एरोस्पेस इंजिनिअर्सना परदेशात एअरक्राफ्ट आणि विमाने भागांच्या उत्पादनांबरोबर परदेशात चांगली संधी उपलब्ध आहे. 

३. जैवतंत्रज्ञान इंजिनिअरिंग
(बायोटेक्‍नॉलॉजी) -
 भारत लवकरच बायोटेक इंडस्ट्रीसाठी एक हॉट स्पॉट ठरेल. असे अंदाज आहेत. यामध्ये आरोग्य सुविधा, शेती, रोग नियंत्रण, अन्न तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, पोषण आणि आहाराचे शास्त्र, पशुपालन आणि बरेच काही समाविष्ट आहे.  जैवतंत्रज्ञान मध्ये बी.टेक बायोटेक्‍नॉलॉजी , बी.टेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि बी. टेक फूड टेक्‍नॉलॉजी हे अभ्यासक्रम आहेत. 

करिअर संधी - शासकीय ड्रग आणि फार्मास्युटिकल संशोधन, पब्लिक फंडेड लॅबोरेटरीज, केमिकल्स, पर्यावरणीय नियंत्रण, ऊर्जा, - जैविक-प्रक्रिया उद्योगक्षेत्र इ. क्षेत्रात करिअर संधी आहेत. 

४. केमिकल इंजिनिअरिंग - हे एक व्यापक अभियांत्रिकी क्षेत्र आहे, ज्यामध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा यांचा अभ्यास केला जातो. 

करिअर संधी - रासायनिक अभियंते रासायनिक निर्मिती कंपनीच्या आर अँड डी, क्वालिटी चेक किंवा उत्पादन विभागामध्ये नोकरी मिळवू शकतात.केमिकल इंजिनिअरिंगमधील बी.टेक. तेल व पेट्रोलियम उद्योग, खनिज प्रक्रिया उद्योग, औषध उद्योग, खत उद्योग बी.टेक केमिकल इंजिनिअर आयओसीएल, बीपीसीएल, ओएनजीसी सारख्या कंपन्यांसह सरकारी क्षेत्रातील नोकऱ्याही शोधू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education More Chance in Engineering Branch Sakal Vidya