व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी आतापर्यंत ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education news 11 lakh students have registered for CET exams pune

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी आतापर्यंत ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : राज्यात विविध प्रकारच्या १६ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातून तब्बल ११ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर त्यातील तब्बल नऊ लाख ५० हजार ८७४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला आहे. तर उर्वरित एक लाख ६५ हजार ७९१ विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण स्थितीत आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या आठ अभ्यासक्रमांसह फाइन आर्ट्स अभ्यासक्रम वगळता, अन्य सर्वच अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी असणारी ऑनलाइन नोंदणीची मुदत आता संपली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि कला संचालनालय यांच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

या परीक्षांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अशा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी तब्बल सहा लाख ८९ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी तीन लाख २४ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी, तर पीसीएम ग्रुपसाठी दोन लाख ८१ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ एमबीए/ एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी एक लाख ६० हजार ७८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील ‘बी एचएमसीटी- सीईटी’ परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया येत्या १९ मे पर्यत सुरू राहणार आहे.

विविध अभ्यासक्रमांच्या एकूण १७ सीईटी प्रवेश प्रक्रिया सुरू

एकूण ११,१६,६६५ विद्यार्थ्यांनी केली ऑनलाइन नोंदणी

सीईटी परीक्षेसाठी आतापर्यंत झालेली नोंदणी

सीईटी परीक्षा : नोंदणी केलेल्यांची संख्या : नोंदणी केलेले आणि अपूर्ण असलेले अर्ज : शुल्क भरून अर्ज निश्चित केलेल्यांची संख्या

एमएचटी- सीईटी (पीसीबी) : ६,८९,४९६ : ८३,३५४ : ३,२४,७८३

एमएचटी-सीईटी (पीसीएम) : - : - : २,८१,३५९

एमबीए/एमएमएस - सीईटी : १,६०,७८१ :२३,१४४ : १,३७,६३७

एमसीए- सीईटी : ४४,५३१ : ६,३६७ : ३८,१६४

एम एचएमसीटी-सीईटी : १३० : ८९ : ४१

एम आर्च- सीईटी : १,०५३, २१४ : ८३९

एकूण १६ अभ्यासक्रमांची एकत्रित आकडेवारी : ११,१६,६६५ : १,६५,७९१ : ९,५०,८७४

Web Title: Education News 11 Lakh Students Have Registered For Cet Exams Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top