वर्षभरानंतर विद्यार्थांना मिळाला न्याय; चुकीनंतर आता फी माफी!

ब्रिजमोहन पाटील
Friday, 27 November 2020

ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये 2019  मध्ये महाराष्ट्रात 'क्यार' आणि 'महा' चक्रीवादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच याच वर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकर्यांचे उत्पन्न बुडाले होते. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वादळाचा फटाका बसलेल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील 349  तालुक्यांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचाही निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. 

पुणे : गेल्या वर्षी आलेल्या 'क्यार' व 'महा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 2019-20 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र राज्यातील 34  जिल्ह्यांमधील 325  तालुक्यांना याचा लाभ झाला, याच जिल्ह्यांमधील 24 तालुक्यांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने न जोडल्याने येथील विद्यार्थी या सवलतीपासून वंचित होते. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर यात एका वर्षानंतर सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर सह पुणे शहराचा व लगतच्या ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या हवेली तालुक्याचा समावेश असल्याने हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये 2019  मध्ये महाराष्ट्रात 'क्यार' आणि 'महा' चक्रीवादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच याच वर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकर्यांचे उत्पन्न बुडाले होते. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वादळाचा फटाका बसलेल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील 349  तालुक्यांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचाही निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. 

34 जिल्ह्यांमध्ये 349 तालुके असताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महसुल विभागास 325  तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सहा जिह्यातील 24तालुक्यांचा समावेश नव्हता, त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्क माफिचा फायदा झालेला नव्हता. 

शुल्क माफीच्या आदेशात त्रुटी असल्याने यामध्ये 24 तालुक्यातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे समोर आले. याबाबत सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पत्र लिहून 24 तालुक्यांचा या यादीत समावेश नसल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यावेळी आमच्याकडे 34 जिल्ह्यातील 325तालुक्यांचीच यादी असल्याने ती यादी महसुल विभागाकडे पाठवली असल्याचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महसुल विभागाला उर्वरित 24 तालुक्यांची यादी सादर केली. त्यानुसार याबाबत कार्यवाही करून या तालुक्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला. याचा आदेश गुरूवारी  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे काढला आहे. 

 
"शासनाने 24 तालुके वगळल्यास परीक्षा शुल्क माफीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित होते, या विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे. पण त्यांनी 2019-20 वर्षाचे शुल्क ही भरले आहे. आता त्यामुळे त्यांनी भरलेले शुल्क परत देण्याची कार्यवाही शासनाने लवकर सुरू करावी यासाठी पाठपुरावा केला जाईल."
अमर एकाड, अध्यक्ष, सुराज्य विद्यार्थी संघटना

कोट
"मी गेल्यावर्षी दोन्ही सत्रांची मिळून 1 हजार 360 रुपये शुल्क भरले आहे. शासनाने परीक्षा शुल्क माफ केल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे."
- ऋतुजा कदम, विद्यार्थीनी, भिगवण

या २४ तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
पुणे- इंदापूर, हवेली 
सोलापूर-  करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा 
नंदुरबार - तलोदा, अक्कलकुआ
 
बीड- पटोदा, शिरूर (कसार), अष्टी , धारूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education news Indapur student fee waiver after one Year