
"NIRF Rankings Drop: No Faculty, No Progress!"
Sakal
पुणे : सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागांची पदभरती न केल्याने विद्यापीठांची ‘राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क’च्या (एनआयआरएफ) क्रमवारीत घसरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने केली आहे.