Someshwarnagar News : ऊसतोड मजुरांच्या कोप्यांत पेटले शिक्षणाचे दिवे; पाच वर्षांत २३१२ मुलांना केले लिहिते-वाचते

रोज सूर्य मावळतीला चाललेला असताना ‘सोमेश्वर’च्या परिसरातील ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमधून बाराखडी आणि पाढ्यांचे स्वर ऐकायला येत आहेत.
sugarcane cutting workers childrens

sugarcane cutting workers childrens

sakal

Updated on

सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पाच वर्षांपूर्वी ‘सोमेश्वर'' कारखान्याने ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘कोपीवरची शाळा’ हा अभ्यासवर्ग सुरू केला होता. या शिक्षणयज्ञात पाच वर्षांत २३१२ मुलांना लिहिते-वाचते करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला गेला आहे.

रोज सूर्य मावळतीला चाललेला असताना ‘सोमेश्वर’च्या परिसरातील ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमधून बाराखडी आणि पाढ्यांचे स्वर ऐकायला येत आहेत. दिवसभर फडातून थकून-भागून आलेली मुले स्वच्छ होऊन अभ्यासवर्गाला पोहोचत आहेत आणि वहीवरती अक्षरे गिरवत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com