
पुणे : नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी, यासह अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने गेल्या आठवड्यापासून सुरू केलेले बेमुदत सामूहिक रजा आंदोलन अखेर मंगळवारी स्थगित केले.