
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत डी.एल.एड. अभ्यासक्रमांची जागा चार वर्षांच्या एकत्रित बी.ए.-बी.एड./बी.एस्सी-बी.एड. कार्यक्रमांना दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या असणाऱ्या डी.एल.एड. महाविद्यालयांचे इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ किंवा स्वतंत्र बी.एड. महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यास मान्यता द्यावी, अशा मागणीचे निवेदन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिले आहे.