पुणे - ‘काळाच्या ओघात आर्थिक विकासाला प्राधान्य मिळत आहे. परंतु, त्याचबरोबरच भविष्यातील चांगला समाज निर्माण करण्यासाठी सुजाण नागरिक तयार करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. ज्ञान आणि चांगला माणूस असणे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे, यात फरक आहे. चांगला माणूस घडण्याचे संस्कार शिक्षणातून होतात.