Baramati News : पिरामल फायनान्समध्ये विद्या प्रतिष्ठानच्या 54 विद्यार्थ्यांना नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education Vidya Pratishthan 54 students get  job in Piramal Finance baramati

Baramati News : पिरामल फायनान्समध्ये विद्या प्रतिष्ठानच्या 54 विद्यार्थ्यांना नोकरी

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील 51 विद्यार्थ्यांची व इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठानमधील तीन अशा 54 विद्यार्थ्यांची पिरामल फायनान्स मुंबई या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयाच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यातून गुणवत्तेच्या आधारे संस्थेतील 54 विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन लाख चौव्वेचाळीस हजार रुपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या 54 विद्यार्थ्यांना सिया व ईश्वरी यांनी ऑफर लेटर्स प्रदान केली.

यंदा विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यात नोकरी मिळाली. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी विशाल कोरे, महाविद्यालयातील प्लेसमेंट समितीचे समन्वयक गजानन जोशी, डॉ. जगदीश सांगवीकर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :studentjob