
कोथरुड : प्रत्येक विद्यार्थी - मग तो शहरातील असो वा ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक सुविधा त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. विशेषतः ग्रामीण, दुर्गम भागात, जिथे आदिवासी व दुर्बल घटकातील मुले, जी रोज दोन - चार कि मी पायपीट करून शाळेत येतात. त्यांना अभ्यासाची, खेळाची गोडी लागावी म्हणून त्यांची शाळा जर सर्व सोयीने युक्त आनंददायी - मोठे क्रिडांगण असणारी असेल तर विद्यार्थी आनंदाने रोज शाळेत येतील. मात्र विकास निधी अभावी आपल्याकडील शाळांची अवस्था बिकट दिसते. अशावेळी समाजातील संवेदनशील लोक पुढे येतात आणि शाळेचे रुपच पालटून टाकतात. अशीच काहीशी घटना ताम्हिणी, ता. मुळशी येथील शाळेच्या बाबतीत घडली आहे.