वादन, गायन, नृत्याचा ‘एहसास’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

‘पंचतुंड नररुंडमालधर’ नांदीने सुरू झालेल्या आणि उत्तरोत्तर मंत्रमुग्ध करत जाणाऱ्या सुरेल सांगीतिक प्रवासात रसिकांनी वादन, गायन आणि नृत्याचा अनोखा संगम अनुभवला. एकाहून एक सरस काव्य, गजल आणि गाणी, विविध वाद्यांचे वादन, मोहक नृत्याविष्कार एकाच रंगमंचावर साकार झाले.

पुणे - ‘पंचतुंड नररुंडमालधर’ नांदीने सुरू झालेल्या आणि उत्तरोत्तर मंत्रमुग्ध करत जाणाऱ्या सुरेल सांगीतिक प्रवासात रसिकांनी वादन, गायन आणि नृत्याचा अनोखा संगम अनुभवला. एकाहून एक सरस काव्य, गजल आणि गाणी, विविध वाद्यांचे वादन, मोहक नृत्याविष्कार एकाच रंगमंचावर साकार झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तबलावादक यश सोमण यांच्या संकल्पनेतून शुभंकर भागवत, देविका चित्ते, ईशा कुलकर्णी, प्रज्ञा देसाई शेवडे, सौरभ करमरकर, अन्वय अहेर या युवा कलाकारांनी एकत्र येऊन नुकताच ‘एहसास, ए म्युझिकल जर्नी’ हा कार्यक्रम सुदर्शन रंगमंच येथे सादर केला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचतुंड नररुंडमालधर या नांदीवर देविका चित्ते आणि ईशा कुलकर्णी यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर यश सोमण यांनी स्वरबद्ध केलेली ‘कारीकारी रैना’ ही रचना आणि शुभंकर भागवत यांची ‘जुस्तजू’ या रचना सादर झाल्या. ‘मै वारी जाऊं’ या यशच्या स्वरबद्ध केलेल्या रचनेवर ईशाने अप्रतिम नृत्य तसेच कृष्णलीलातून उत्कृष्ट अभिनय सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शुभंकर याने स्वरबद्ध केलेल्या ‘बरबादिया’ या रचनेवर देविका हिने गाणे सादर केले. यानंतर प्रज्ञा देसाई शेवडे हिचे ‘काँकरिंग मूड्‌स’अंतर्गत व्हायोलिन वादन झाले. शुभंकर याने स्वरबद्ध व शब्दबद्ध केलेल्या ‘शायद वो तुम हो’ ही अतिशय सुरेल रचना नवोदित गायक सौरभ करमरकर याने सादर केली. ज्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. अन्वय अहेर याने लीड गिटारवर ‘चलो हम साथ चले’ आणि ‘कोई दिवाना केहता है’ या उडत्या चालीच्या रचना सादर केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ehsas e musicial journey event