मेट्रोच्या कामाची "ईआयबी'कडून पाहणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

शहर व परिसरात सुरू असलेल्या पिंपरी - स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाची युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (ईआयबी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली.

पुणे - शहर व परिसरात सुरू असलेल्या पिंपरी - स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाची युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (ईआयबी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली. महामेट्रो आणि ईआयबीमध्ये शुक्रवारी 1600 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"ईआयबी'चे उपाध्यक्ष ऍन्ड्य्रू मॅकड्‌वॉल तसेच मारीय शॉ बरार्गन यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने रामवाडी स्थानक, कृषी महाविद्यालयाच्या आवारातील भुयारी बोगदा, महिलांसाठी उभारण्यात येत असलेले विशेष डबे, मेट्रोच्या डब्यांत दिव्यांगांसाठी केलेली व्यवस्था आदींची पाहणी केली. तसेच मेट्रोमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना किती नुकसानभरपाई, कशा पद्धतीने मिळाली, याचीही माहिती त्यांनी घेतली. दरम्यान महामेट्रो आणि ईआयबी यांच्यातील आर्थिक करारावर शुक्रवारी मुंबईत स्वाक्षऱ्या होणार आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून भुयारी मेट्रोची, तसेच शिवाजीनगर ते रामवाडीदरम्यानच्या मेट्रो मार्गाची आणि स्थानकांची कामे होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EIB surveys Metro work