फुरसुंगी - पालखी महार्गावरील फुरसुंगी ते वडकी दरम्यान जुने असलेले आठ पूल पाडण्यात येत आहेत. पूल एकदाही वाहतुकीसाठी वापरता न आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पालखी महामार्गाचे फुरसुंगी ते सासवड या टप्प्यातील काम सध्या सुरु आहे. या मार्गावर वडकीपर्यंत ओढे आणि नाल्यांवर आठ पूल दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. पूल बांधून तयार होते. मात्र त्यावेळेस या पुलांकडे जाणाऱ्या मार्गाचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे हे पूल वाहतुकीच्या प्रतिक्षेतच राहिले.
यावरून कधी एका दुचाकीनीही प्रवास केला नाही. नवीन महामार्गाच्या कामात येथील जुने पूल सध्या पाडून त्याच ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. मात्र जुन्या पुलासाठी करण्यात आलेला खर्च वाया गेल्याने नागरिकांकडून खंत व्यक्त होत आहे.
आकाश बहुले (ग्रामस्थ,उरुळी देवाची) -
पूल बांधतानाच प्रशासनाने विचार करणे गरजेचे होते. पूल बांधून जर वापराविनाच पडावा लागत असेल तर हा जनतेच्या पैश्याचा अपव्यय नाही का? प्रशासनाच्या दूरदृष्टीचे प्रदर्शन होत आहे. पूल पुन्हा बांधण्यासाठी करोडोंचा खर्च होणार आहे.
प्रवीण मोडक (ग्रामस्थ,प्रवीण मोडक) -
या पुलांवरून कधी पदचारीही चालत गेला नाही.पूल वापरात आले असते तर येथील वाहतूक कोंडी कमी झाली असती. कोंडीमुळे होणारे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असते. आता हे पूल पाडण्यासाठीही खर्च होत आहे.
अभिजित आवटी (व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग विभाग) -
हे पूल दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आले असावेत. महामार्गाचे मोजमाप आणि जुन्या पुलांचे मोजमाप यामध्ये तफावत जाणवत असल्याने नागरिकांच्या आणि प्रवाश्यांच्या सुरक्षततेचा विचार करता हे पुन्हा बांधणे गरजेचे आहे. महामार्गावर होणारी लहान चूक सुद्धा दुर्लक्षित करता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.