लॉकडाऊनमध्ये विभक्त पालक अन् मुलांमध्ये वाढतोय दुरावा; मुलांशी बोलता यावे म्हणून पालक न्यायालयात

Eight lawsuits filed in Family Court by to talk to children during lockdown.jpg
Eight lawsuits filed in Family Court by to talk to children during lockdown.jpg
Updated on

पुणे : विभक्त असलेल्या पालकांना लॉकडाऊनमुळे आपल्या मुलांना भेटणे शक्य नसल्याने त्यांच्याशी किमान फोनवर बोलता यावे, यासाठी मुलांचा ताबा नसलेला पालक कौटुंबिक न्यायालयात धाव घेत आहे. मुलांची चौकशी करता यावी व त्यांच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोलता यावेत म्हणून येथील न्यायालयात आठ दावे दाखल झाले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुलाचा ताबा असणारा पालक दुसऱ्या पालकास मुलांबरोबर फोनवर बोलू देत नसल्याने त्याबाबतची परवानगी मिळण्यासाठी न्यायालयाचा आधार घ्यावा लागत आहे. जोडपं विभक्त झाल्यानंतर मुलांचा ताबा बऱ्याचदा आईकडे देण्यात येतो तर वडिलांना मुलाच्या भेटीसाठी वार ठरवून दिला जातो. त्याच दिवशी दुसरा पालक मुलांना भेटू शकतो, फिरायला घेऊन जाऊ शकतो किंवा स्वतःच्या घरी नेऊ शकतो. मात्र लॉकडाउनमुळे ना मुलांना भेटता येत आहे ना त्यांना घरी नेता येत आहे. त्यामुळे त्यांच्याशी किमान फोनवर किंवा व्हिडिओ कॉल करून बोलता यावे, अशी ताबा नसलेल्या पालकाची इच्छा आहे. मात्र नवरा-बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात वाद असतील किंवा ताबा नसलेल्या पालकाला त्रास द्यायचा असेल तर मुलांना त्यांच्याशी बोलू दिले जात नसल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यामुळे ताबा नसलेला पालकाला मुलाशी बोलता यावे म्हणून न्यायालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

पुण्यात गोंधळ; कोरोनाबाधित आणि तपासणीला आलेले एकाच ठिकाणी

व्हिसीद्वारे सुनावणी :  
या दाव्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) सुनावणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याबाबतचे निर्देश कुटूंबिक न्यायालयाचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यानुसार दुपारी 12 ते 2 या वेळेत व्हीसीद्वारे या दाव्यांवर सुनावणी होते. संबंधित दावा तातडीचा का आहे? याचा अर्ज वकिलांना दाव्यासोबत जोडावा लागतो. 

फ्लूची लक्षण आहेत? घाबरू नका, पिंपरीत पालिकेनं केलीय सोय!

दाखल असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत 
संबंधितांनी लॉकडाउननंतर रजिस्टरकडे दाखल करावी, असे निर्देश आहेत. पक्षकारांची गर्दी कमी व्हावी म्हणून न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळा कमी करण्यात आलेल्या आहेत. मात्र पक्षकारांना तातडीचा दावा दाखल करण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत आठ दावे दाखल करण्यात आले असून ते मुलांशी बोलण्याची परवानगी मिळण्याबाबत आहेत. 
- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com