एका रात्रीत तीन वेगवेगळ्या अपघातात आठ जणांचा मृत्यू; कोठे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार लोक गंभिर जखमी असल्याची प्राथमिक माहीती उपलब्ध झाली आहे.

यवत - यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार लोक गंभिर जखमी असल्याची प्राथमिक माहीती उपलब्ध झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्यरात्रीच्या सुमारास हे अपघात झाले आहेत. चालकांच्या बेफिकीरी बरोबरच रस्त्यावरील खड्डे या अपघातास कारणीभूत आहेत. वाखारी (ता. दौंड) येथे महामार्गावर पायी चालणाऱ्या एका व्यक्तीस अज्ञात वाहनाने ठोकर मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कासुर्डी (ता. दौंड) येथील शेरू ढाबा येथे एक कंटेनर चालक लघुशंकेसाठी थांबला. त्याने आपल्या ताब्यातील वाहन बेफिरीने रस्त्यातच उभे केल्याने त्यास एका कारची मागून जोरदार धडक बसली. यात कारमधील सर्वच्या सर्व पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यात कोरोनाचा थरार कायम; रुग्णसंख्येने ओलांडला अडीच लाखांचा आकडा

तीसरा अपघात सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला. अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्यावर एक मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यात गॅस वाहक कंटेनरचे पुढील चाक आटकल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेकडील मार्गिकेवर गेला. त्यास त्या मार्गिकेने जाणाऱ्या दोन कार या वाहनास धडकल्या. त्यात एकाचा जागीच तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या तीनही अपघातांची माहिती मिळताच यवत पोलीसांनी तातडीने पोहोचून पुढील कारवाई सुरू केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight people died in three separate accidents in one night