पुण्यात कोरोनाचा थरार कायम; रुग्णसंख्येने ओलांडला अडीच लाखांचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

दिवसभरात ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३८ रुग्ण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांनी रविवारी (ता.२०) रात्री नऊ वाजता अडीच लाखांचा आकडा ओलांडला आहे. दरम्यान, दिवसभरात ३ हजार ६६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ७०० रुग्णांचा समावेश आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये ७४९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८६९, नगरपालिका क्षेत्रात २८३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६६ नवे रुग्ण सापडले आहेत.

वंशाच्या दिव्यासाठी सासरचे करायचे छळ; अखेर कंटाळून तिनं संपवलं जीवन​

दरम्यान, दिवसभरात ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३८ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८ आणि नगरपालिका क्षेत्रातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शनिवारी (ता.१९) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता.२०) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

...यासाठी गुप्तवार्ता यंत्रणा सक्षम व्हायला हवी; गृहमंत्री देशमुख यांचे प्रतिपादन​

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार १६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५४५, पिंपरी चिंचवडमधील १ हजार २५१,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३९ , नगरपालिका क्षेत्रातील १६८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ६० जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ३ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ६९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील २०४ जण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total number of corona patients in Pune district has crossed two and half lakh on Sunday 20th September