मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होती. पावणेदहा वाजण्याच्या सुमारास येथील मुक्ताबाई ढाब्यासमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने प्रवासी व्हॅनला मागून धडक दिली.
नारायणगाव : येथील पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway Accident) मुक्ताई ढाब्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅन (Maxximo Van) व इतर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमो व्हॅनच्या चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच उपचार सुरु असतानाच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.