पुण्यात गृह खरेदीत आठ टक्क्यांनी वाढ

विक्री मूल्यही २७ टक्क्यांनी वाढले; क्रेडाई पुणे मेट्रोचा ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’
पुण्यात गृह खरेदीत आठ टक्क्यांनी वाढ
पुण्यात गृह खरेदीत आठ टक्क्यांनी वाढ

पुणे : पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान ५३ हजार घरांची विक्री झाली. जानेवारी ते जुलै २०१९ चा विचार करता त्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ मध्ये ४९ हजार घरांची विक्री झाली होती, तर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत विक्रीमूल्यात तब्बल २७ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली.

आकाराने मोठ्या असलेल्या घरांच्या खरेदीमुळे विक्री मूल्यात वाढ झाली आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’ने तयार केलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’मध्ये ही माहिती दिली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या ३८ व्या सर्वसाधारण सभेमध्ये या अहवालाचे अनावरण केले. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, सचिव अरविंद जैन, उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता उपस्थित होते.

पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम क्षेत्राचा विचार करता जानेवारी ते जुलै २०१९ व २०२१ दरम्यान विक्री झालेल्या घरांची संख्या, आकार आणि किमती यांवर अहवालातील आराखडे बांधले आहेत.

पुण्यात गृह खरेदीत आठ टक्क्यांनी वाढ
PM मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; UNGA ला करणार संबोधित

हिंजवडी, वाकड, बाणेरला पसंती

हिंजवडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी या पुण्याच्या वायव्य भागात गृहखरेदीला ग्राहकांकडून पसंती मिळत असून, जानेवारी ते जुलै २०२१ मध्ये या भागात तब्बल सात हजार १६० कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली. शहराचा विचार केल्यास एकूण विक्रीच्या २६ टक्के विक्री ही एकट्या याच भागात झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. या खालोखाल पिंपरी-चिंचवड भागात २३.५ टक्के विक्री झाल्याचे समोर आले आहे.

पुण्यात गृह खरेदीत आठ टक्क्यांनी वाढ
अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा केला प्रयत्न

अहवालात आयजीआर महाराष्ट्राच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीचा समावेश केल्याने यामधून आश्चर्य वाटावे असे निष्कर्ष समोर आले आहेत. अहवालात नमूद २०१९ व २०२१ चे आराखडे हे आशावादी आहेत. वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे तयार केलेल्या या अहवालाचा उपयोग पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना भविष्यात यशस्वी प्रकल्प उभारणीसाठी निश्चित होईल.

- अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो

पुणे महानगर क्षेत्रात विक्री झालेल्या घरांच्या किमती


  • २१ हजार ५०० कोटी : जानेवारी - जुलै २०१९

  • २७ हजार ५०० कोटी : जानेवारी -जुलै २०२१

७० लाखांहून कमी किंमत असलेल्या घरांची विक्री

  • ६९ टक्के : जानेवारी - जुलै २०१९

  • ६३ टक्के : जानेवारी - जुलै २०२१

दोन कोटींहून अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीतून

दोन हजार ३५० कोटींची उलाढाल

८८ टक्क्यांनी वाढ

  • मोठ्या आकारातील सदनिका विक्री

  • ग्राहक कम्युनिटी लिव्हिंगकडे वळत आहेत

  • पुणे महानगर क्षेत्रात एकूण घरांच्या विक्रीमध्ये वायव्य पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही भागांचे एकत्रितपणे ५० टक्के योगदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com