esakal | पुणे : शहर पोलिस दलातील साडेआठ हजार पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लस 
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : शहर पोलिस दलातील साडेआठ हजार पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लस 

पोलिसांनाही कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. त्यामुळेच लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

पुणे : शहर पोलिस दलातील साडेआठ हजार पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लस 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे ः कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी बळ मिळाले आहे. शहर पोलिस दलातील सात हजार पोलिसांना पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त पोलिसांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामुळे पोलिसांना काम करण्यासाठी आता चांगलेच बळ मिळाल्याची चिन्हे आहेत.

पुण्यात मिनी लॉकडाऊन तरीही कोरोनाचा कहर; रुग्णवाढीचा आकडा चिंताजनक​

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून आत्तापर्यंत पुणे पोलिसांकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. लॉकडाउनमध्ये नागरीकांना बाहेर पडण्यास मज्जाव करून त्यांचा जीव वाचविण्यास हातभार लावतानाच, दुसरीकडे संकटात सापडलेल्या परप्रांतीय कामगारांना, अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या भोजन, प्रवासाची सोय करण्यापर्यंतची माणुसकी पोलिसांच्या खाकी वर्दीतून दिसून आली. हे सगळे करतानाच दीड हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तर १२ जणांना आत्तापर्यंत जीव गमवावा लागला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, कोरोनामध्ये आघाडीवर असणाऱ्या पोलिसांनाही लसीकरण करण्यासाठी पुणे पोलिस दलाकडून प्रोत्साहन देण्यात आले होते. शहर पोलिस दलातील सहा हजार ९५३ पोलिसांना लसीकरणामध्ये पहिला डोस मिळाला आहे. त्यामध्ये ५९१ अधिकारी, तर ६ हजार ३६२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १७६६ पोलिसांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२४ अधिकारी आणि १६४२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दारु आणि इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ब्रिटनमध्ये झालं संशोधन​

पोलिसांनाही कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. त्यामुळेच लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात सहा हजार ९५३, तर दुसऱ्या टप्प्यात १७६६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लशीचा डोस देण्यात आला आहे.-डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन)

कर्तव्य बजावताना नागरिकांशी थेट संपर्क येत असल्याने संसर्गाची दाट शक्‍यता असते. कोरोनामुळे स्वतःसह कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्‍यक सर्व खबरदारी व काळजी घेत आहोत. त्याचबरोबर कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला असून दुसरा डोसही लवकरच मिळेल. तरीही आवश्‍यक काळजी घेण्यावर भर देत आहोत.-महेश गाढवे, पोलिस हवालदार, दत्तवाडी पोलिस ठाणे

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image