esakal | "आइन्स्टाईन'च्या सिद्धांताची झाली परीक्षा; गुरुत्वीय लहरींचा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

Gravitational-wave

ब्रह्मांडातील प्रचंड वस्तुमान असलेल्या पदार्थांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर प्रकाश पडला असून, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतावाद सिद्धांताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली आहे. 

"आइन्स्टाईन'च्या सिद्धांताची झाली परीक्षा; गुरुत्वीय लहरींचा अभ्यास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - अमेरिकेतील दोन अद्ययावत वेधशाळांनी टिपलेल्या गुरुत्वीय लहरींतून नवीन संशोधन पुढे येत आहे. विश्‍लेषणानंतर ब्रह्मांडातील प्रचंड वस्तुमान असलेल्या पदार्थांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर प्रकाश पडला असून, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतावाद सिद्धांताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली आहे. या संशोधनामध्ये प्रचंड माहितीचे पृथक्करण करण्यात भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

अमेरिकेतील लायगो आणि इटलीतील विर्गो येथील वेधशाळेच्या उपकरणांनी ऊर्जेचे उत्सर्जन करणाऱ्या ताऱ्यांपासून बनलेले कृष्णविवर (ब्लॅकहोल) आणि प्रचंड घनत्व असलेल्या खगोलीय पदार्थातून आलेल्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास केला आहे. 15 ऑगस्ट 2019 मध्ये पहाटे 2 वाजून 40 मिनिटांनी गुरुत्वीय लहरींची नोंद घेतली होती. आता त्याचे निष्कर्ष हाती आले असून, त्यावर संशोधन सुरू आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर (आयआयटी) आणि चेन्नई येथील मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांचा "डेटा ऍनॅलिसिस'मध्ये महत्त्वपूर्ण सहभाग आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संशोधनाची वैशिष्ट्ये 
1) दोन प्रचंड महाकाय खगोलीय पदार्थांचे आकारमान 1 ः 9 प्रमाणात होते. वस्तुमानात एवढा मोठा फरक असलेली अशी घटना आजपर्यंत अभ्यासली नव्हती. 
2) प्रचंड न्यूट्रॉन ताऱ्यापासून तयार झालेले सर्वांत कमी वस्तुमानाचे कृष्णविवर आहे. यातून प्रचंड घनत्व असलेल्या वस्तुमानाचे विलीनीकरण कसे होते? यावर प्रकाश पडेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या गोष्टींवर पडला प्रकाश 
- दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींबरोबरच मोठ्या प्रमाणावर दृश्‍यप्रकाशाचे उत्सर्जन होते. पण, दोन कृष्णविवरांचे विलीनीकरण होताना दृश्‍यप्रकाशाची नोंद होत नाही. 
- "जीडब्ल्यू 190814' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घटनेमुळे हबल स्थिरांकाची मोजणी नव्याने झाली. 
- हबल स्थिरांक विश्वाच्या विस्ताराचा किंवा प्रसारण्याचा दर सांगतो. सध्या तो 75 किलोमीटर प्रतिसेकंद प्रतिमेगापार्सेक आहे. (एक मेगापार्सेक ः 32 लाख 61 हजार 563 प्रकाशवर्षे.) 
- यापुढील संशोधनात लायगो इंडियाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. 

loading image