
‘‘साध्या वेशातील पोलिस माझ्या जावयावर पाळत ठेवून होते. पोलिस लगेचच पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती, व्हिडिओ देतात. पोलिस किंवा सरकार एवढी तत्परता हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रफुल्ल लोढाबाबत का दाखवत नाहीत? या कारवाईमागे कोणीतरी ‘सूत्रधार’ असून, पोलिसांनी आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.