
राऊतांच्या घरातील 'त्या' पैशांशी शिंदेंचा संबंध? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं
पुणे : संजय राऊत यांच्या घरात ईडीला सापडलेल्या रोख रकमेपैकी बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव लिहिल्याचं आढळून आलं होतं. या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं. हा काय प्रकार आहे हे केवळ संजय राऊतच सांगू शकतील त्यामुळं हे त्यांनाच विचारायला हवं, असंही त्यांनी म्हटलं. पुण्यात मुख्यमंत्र्यांनी आज पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Eknath Shinde connection with money found by ED in Sajay Raut house CM gave explanation)
हेही वाचा: मविआचे धर्म फक्त शिवसेनेनेच पाळायचे का? माजी आमदाराचा सवाल
"संजय राऊत यांच्या घरात पैसे सापडले आहेत, त्यामुळं याबाबत तुम्ही त्यांनाच विचारायला हवं. त्यांच्या घरात सापडलेल्या पैशांवर माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही. त्यांच्या घरातील पैशांवर मी माझं नाव लिहू शकतो का? असा सवाल करता त्या पैशांबाबत तुम्हाला संजय राऊतच सांगू शकतील," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
संभाजी महाराजांच्या स्मारकाला स्थिगिती नाही - मुख्यमंत्री
वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत काही दिवसांपूर्वी माध्यमांमधून दिशाभूल करणाऱ्या बातम्या छापून आल्या होत्या. पण या स्मारकाच्या विकास आराखड्याला स्थगिती देण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांची ३१ जुलै रोजी ईडीकडून ९ तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर रात्री उशीरा त्यांना ईडीनं ताब्यात घेतलं. दरम्यान, त्यांच्या घरात टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे साडे अकरा लाख रुपयांची रोकड ईडीनं जप्त केली होती. पण सर्वात खळबळजनक बाब म्हणजे यांपैकी १० लाख रुपयांच्या नोटांच्या बंडलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची लेबल्स असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळं या प्रकरणानं वेगळचं वळण घेतलं होतं.
Web Title: Eknath Shinde Connection With Money Found By Ed In Sajay Raut House Cm Gave Explanation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..