

Eknath Shinde’s Development Pitch from Katraj
Sakal
आंबेगाव : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील सभेतून विकासाचा थेट एल्गार पुकारत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील पहिली जाहीर सभा कात्रज येथे पार पडली आणि या सभेने संपूर्ण निवडणूक वातावरण तापवून टाकले. कोऱ्या पाटीवरच विकासाची अक्षरे लिहिली जातात असे ठणकावून सांगत विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.