
"महाराष्ट्रात मराठी, मराठीसाठी फक्त ठाकरे", या घोषणांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनंतर राजकीय मंचावर दिसणार आहेत. ५ जुलै रोजी होणाऱ्या दोन्ही भावांच्या या रॅलीतून आगामी महानगरपालिका निवडणुकांमधील नवीन समीकरणाचे चित्रही उलगडेल. मराठी मुद्द्यावरून दोन बंधू एकत्र येणा आहे. मात्र आता अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओही समोर आला यामुळे आता खळबळ उडाली आहे.