
Eknath Shinde: मोदींबद्दल मी काय बोलू, ते तर जगात लोकप्रिय; शहांसमोर CM शिंदेंचे गौरवोद्गार
पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आज अमित शहा यांनी आज पुण्यात मोदी@20 या पुस्तकार्चाय अनुवादाचे प्रकाशन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदी साहेब यांच्याबद्दल मी काय बोलू, देशात नाही तर जगात सगळ्यात ते लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहे. या गोष्टीची प्रचिती मला दावोस मध्ये आली. अनेक देशांचे प्रतिनिधी मला भेटले हे सगळे लोकं खूप आपुलकीने बोलत होते. मी त्यांना म्हणालो "हम सब साथ ही है". पण सरकार कसे स्थापन झाले हे सगळ्यांना सांगू शकत नाही.
आपली अर्थव्यवस्था जगाला हेवा वाटणारी आहे. देशाचे नाव अभिमानानं घेतलं जातं आहे. देशात नाही तर सगळ्या जगात त्यांची लोकप्रियता मिळाली आहे, म्हणून त्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा राज्य सरकारला गरजेचा आहे.
मला सांगायला अभिमान वाटतो की बाळासाहेब सांगायचे की मला पंतप्रधान बनवा मी काश्मीर मधील ३७० हटवतो. युतीमध्ये आम्ही लढलो, पण सरकार आमच्या बरोबर स्थापन करायला पाहिजे होतं ना पण तस नाही झालं मग आम्ही केलं ते बरोबर ना, असा प्रश्न शिंदे यांनी विचारला. अमित भाई यांनी सरकार स्थापन करताना सांगितले की "आगे बढो हम आपके साथ चट्टान की तरह खडे है", असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी केला.