

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा
सज्ज ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. राठोड
-----
कोल्हापूर : जुलै-ऑगस्टमध्ये दुष्काळी स्थिती असली तरी जूनमधील संभाव्य अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या पूरस्थिती आणि भूस्खलनासारख्या आपत्तींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपत्तीची वाट न पाहता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या नैसर्गिक घटना घडू शकतात, हे गृहीत धरून यंत्रणांनी सतर्क राहावे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणी उपसा आणि वापराचे सुसूत्रीकरण करण्याचे धोरण अवलंबण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
यंदा जूनमध्ये मुसळधार पाऊस, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.
मॉन्सूनमधील अनिश्चितता पाहता उपलब्ध पाणीसाठा केवळ जूनपर्यंत मर्यादित न ठेवता तो ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल, या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करणे अनिवार्य आहे. जलसंपदा आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील धरणसाठा आणि भूजल पातळीचा दररोज आढावा घ्यावा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठा योजनांचे तातडीने ऑडिट करून गळती रोखावी. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तातडीने ‘अॅडव्हायझरी’ प्रसिद्ध करावी. शेतकऱ्यांना पीकविम्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची शिफारस करावी. त्याचप्रमाणे, पशू संवर्धन विभागाने जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही याची खात्री करावी. चारा डेपोचे आगाऊ नियोजन करून पशुधनासाठी चारा आणि पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.